छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :वज्रमूठ सभेत सर्वात जास्त त्रास अजित पवार यांना होत असेल, खुर्ची कालपर्यंत ठेवायची का नाही हा संभ्रम होता. याआधी बनवलेल्या कमिटीमध्ये अजित पवार यांचे कुठेही नाव नव्हते. अजित पवार यांना बोलावले असे संजय राऊत म्हणत आहेत, परंतु ते काय बोलतील हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे. अजित पवार सभेला शरीराने राहतील मात्र मनाने नाही. त्यांचा वज्रमुठ सभेला कवडीचाही इंटरेस्ट केला. ते मनातून कुठे आहेत, हे दोन-चार दिवसात कळेल. ते सांभाळून पाऊल टाकत आहेत. पहिले चुकलेले पाऊल पुन्हा चूक होता कामा नये हा निर्धार असावा. अजित पवारांच्या मनामध्ये पुढची घडामोडी ठाम आहे. ते घेतलेला निर्णय ते बदलत नाहीत, काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल, अजित पवार निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले.
सभेने चित्र बदलत नाही :दुर्दैवाने एकत्रित सर्वांना वज्रमुठ सभा घ्यावी लागत आहे.आमची एकजूट आहे हे, दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सभा घेऊन जर मते पडत असतील आणि वातावरण बदलत असेल, तर हा त्यांचा गैरसमज असल्याची शिरसाट यांनी टीका केली. तर चंद्रकांत खैरे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला कशाला आले होते, चंद्रकांत खैरे यांनी बकवास बोलणे बंद केले पाहिजे. थोडे मॅच्युअर व्हायला हवे. त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत पक्षात आणि बाहेर नाही, असे देखील शिरसाट म्हणाले.