औरंगाबाद - शहरात धर्मांध टोळके मोकाट झाले आहे, अवैध धंदे वाढले असून गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे. असे असताना पोलीस यंत्रणेने कायद्याने दिलेले अधिकार थंड बस्त्यात ठेवले आहेत, असा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यासंदर्भात खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेत निवेदनही सादर केले आहे.
गुन्हेगार, धर्मांधांना आवरा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, खैरेंनी घेतली आयुक्तांची भेट - औरंगाबाद
शहरात धर्मांध टोळके मोकाट असून बायजीपुरा, बन्सीलालनगरमध्ये वाहनांवर झालेली दगडफेक ही एका विशिष्ट गटातर्फे झाल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर गुटखा, मटक्यांचे सर्रास धंदे सुरू असताना पोलिसांकडून कारवाईत भेदभाव सुरू आहे. शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वेळीच गुन्हेगारांना आवर घातला नाही, तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्य वतीने देण्यात आला आहे.

यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार प्रदिप जैस्वालसह मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.