महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे उद्या ​औरंगाबाद दौऱ्यावर; अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी - ​​Thackeray Aurangabad Visit

परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणीसाठी ( Check the loss of farmers ) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जाणार ( Uddhav Thackeray visit Aurangabad ) आहेत.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Oct 22, 2022, 5:45 PM IST

मुंबई -परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणीसाठी ( Check the loss of farmers ) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जाणार ( Uddhav Thackeray visit Aurangabad ) आहेत. यावेळी आढावा घेऊन तातडीने मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे पहिल्यांदाच दौऱ्यावर जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसैनिकांसाठी दौरा नवचैतन्य निर्माण करणारा असल्याचे बोलले जाते.

शेतीचे मोठे नुकसान -राज्यात परतीच्या पावसाने धूमशान घातले आहे. अनेक भागांत पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातही गेल्या 15 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही, अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details