औरंगबाद - ज्या पक्षाचे ९८ टक्के नेते जामिनावर बाहेर आहेत. ते दुसऱ्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. महात्मा गांधींनी काँग्रेस बरखास्त करण्यास सांगितले होते. पण आता राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात नोंद होईल, अशी टीका भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. राफेल प्रकरणी मोदी तुरुंगात जातील असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिले.
राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात होईल नोंद - शहानवाज हुसेन - bjp on 370
राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात नोंद होईल, अशी टीका भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी केली.
शहानवाज हुसेन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडली. राज ठाकरे यांचा उपयोग काँग्रेस राष्ट्रवादीने घ्यावा. नुसते महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यात त्यांना प्रचाराला घेऊन जावे, जे लोक निवडणूक लढवत नाहीत त्यांच्यावर आम्ही बोलून वेळ वाया घालणार नाही, अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.
राहुल गांधी स्वतः जामिनावर बाहेर आहेत. यावर काँग्रेसने बोलावे, असे ते म्हणाले. कश्मिरमध्ये कलम ३७० लागू आहे. हे कलाम तिथल्या लोकांसाठीच फायदेशीर नाही. हे कलम काढले तर उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती भारताशी संबध तोडू असे अशी धमकी देत आहेत. मात्र, त्यांना माहित आहे 'जिना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, असे म्हणत तुम्हाला आमच्या सोबतच रहायचे असल्याचे सांगत भारत मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे ते सांगितले.