औरंगाबाद- वाळूज परिसरातील गणेश नगर भागात रविवारी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून सव्वालाखाचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकणी गुटखा व सुगंधीत तंबाखू विकणाऱ्या सचिन नागराज म्हस्के (वय २८, रा.गणेशनगर, वाळुज) याला अटक केली.
वाळूज परिसरात प्रशासनाचा छापा; सव्वालाखाचा गुटख्याचा साठा जप्त
खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून यामध्ये एकाला अटक केली आहे.
सचिन हा अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. विभागाच्या निरीक्षक सुलक्षणा जाधवर, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, यांच्या पथकाने छापा मारून त्याला ऐवजासह अटक केली. त्याच्याकडून १ लाख २९ हजार ७७२ रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. सचिनवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एम.डी. शहा, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.