औरंगाबाद- चारा छावणीमध्ये घोटाळा केला तर खपवून घेताला जाणार नाही. घोटाळा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करु. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई केली जाईल असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी ते जिल्ह्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
चारा छावणीच्या माध्यमातून घोटाळा केला तर सहन करणार नाही- सदाभाऊ खोत - Scam
या आगोदर चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार आहोत आणि गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खोत यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर लासूर भाागतील दुष्काळाची पहाणी केली आणि काही चारा छावणींना भेटीही दिल्या देत शेतकऱ्यांशी संवादही साधला. पुढे बोलताना खोत म्हणाले की, या आगोदर चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार आहोत आणि गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी दौऱ्यादरम्यान खोत यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांब्यावरुन चर्चांना उधाण आले होते. मात्र, आपण फक्त त्या हॉटेलमध्ये आंघोळीला गेलो असल्याचे स्पष्टीकरण खोत यांनी दिले आहे. तरी माझ्याकडून ही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.