औरंगाबाद -माझा अर्ज जाणीवपूर्वक बाद केला. माझ्यासह इतर काही उमेदवारांच्या अर्जात त्रुटी होत्या. मात्र, त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी मुदत देण्यात आली. यामध्ये बाळासाहेब विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. मग मला संधी का दिली नाही? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचे औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी केला आहे.
'अनेकांच्या नामांकन अर्जात चुका, मात्र माझाच अर्ज जाणीवपूर्वक बाद केला' - औरंगाबाद पश्चिम मतदार संघ
औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षातर्फे रमेश गायकवाड यांनी अपला उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश गायकवाड यांनी दोन अर्ज सादर केले असताना दोन्ही अर्जात तांत्रिक चुका असल्याचे सांगत अर्ज बाद करण्यात आले.
औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक पक्षातर्फे रमेश गायकवाड यांनी अपला उमेदवारी अर्ज भरला होता. रमेश गायकवाड यांनी दोन अर्ज सादर केले असताना दोन्ही अर्जात तांत्रिक चुका असल्याचे सांगत अर्ज बाद करण्यात आले. या निर्णयाने औरंगाबाद शहरातून काँग्रेसला हद्दपार व्हावे लागले आहे. त्यामुळे रमेश गायकवाड यांनी किती उमेदवारांच्या अर्जात तांत्रिक चुका आहेत याचा तापस केला. त्यामधे अनेक उमेदवारांच्या अर्जात काही चुका आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली असल्याचा आरोप रमेश गायकवाड यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दबावाखाली माझा अर्ज बाद केला असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागत असल्याचे ते म्हणाले.