औरंगाबाद - राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परवानगी देण्यात आली. त्यानंतर सकाळपासूनच सर्वच धार्मिक स्थळ उघडण्यात आली आहेत. औरंगाबादेत असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर सर्वांसाठी उघडण्यात आले. पहाटे पाच वाजता मंदिरात पुजाऱ्यांनी आरती करून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले केले.
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रचलित आहे. घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण होत नाही अशी महती आहे. मार्च महिन्यापासून मंदिर बंद होते. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मंदिर सुरू करण्यात आले असले तरी भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे. त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टतर्फे ही माहिती देण्यात आली.
माजी खासदार खैरे यांच्या हस्ते आरती करून भद्रा मारुती मंदिर सुरू
खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते आरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. चंद्रकांत खैरे यांनी राज्यात सर्वप्रथम मंदिर खुले करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने मंदिर खुले करण्याचा निर्णय दिल्याने आनंद झाल्याची भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. सकाळी नऊच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. धार्मिक स्थळ उघडताना गाभारा मात्र भक्तांसाठी बंद राहणार आहे. देवाच्या मूर्तीला कोणाचा स्पर्श होऊ नये यासाठी गाभारा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टने दिली आहे.
शहरातील मस्जिद देखील आजपासून सुरू