महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दानवेंची पुन्हा तीच चूक; ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार - terrorist

स्वतःची चूक लक्षात येताच रावसाहेब यांनी सावरासावर केली. दानवे हे वक्तव्य चुकून करत आहेत, की यामागे चर्चेत राहण्याचा दुसरे काही कारण आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही.

जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा- शिवसेना- रिपाई -रासप -शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील

By

Published : Apr 6, 2019, 5:07 AM IST

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली आहे. भारतीय जवान शहीद झाले ऐवजी भारताचे ४२ अतिरेकी मारले गेले, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. शहरातील मुकुंदवाडी येथे दानवे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी त्यांनी देशाचे ४२ अतिरेकी मारले गेल्याचा पुनरुच्चार केला.

जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा- शिवसेना- रिपाई -रासप -शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील


जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा- शिवसेना- रिपाई -रासप -शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय सैनिकांना चुकून अतिरेकी संबोधल्याचे समोर आले होते. मात्र, त्यावेळी हे वक्तव्य कोणीतरी मोडतोड करून टाकल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला होता. ही घटना ताजी असतानाच रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली. स्वतःची चूक लक्षात येताच रावसाहेब दानवे यांनी सावरासावर केली. मात्र, तोपर्यंत सभेला उपस्थित असलेल्या मतदारांमध्ये चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले.
याआधीही दानवेंनी विवादास्पद विधानं केली होती. काही दिवसाआधीच त्यांनी विंग कमांडर अभिनंदन याला हेलिकॉप्टरचा पायलट असे संबोधले होते. रावसाहेब दानवे हे वक्तव्य चुकून करत आहेत, की यामागे चर्चेत राहण्याचा दुसरे काही कारण आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. त्यामुळे भाजप अडचणीत सापडत आहे हे मात्र नक्की.

सैनिकांचा शौर्याच श्रेय घेण्याची सुरुवात काँग्रेसने केली - हरिभाऊ बागडे


यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधीत केले. सैनिकांचा शौर्याच श्रेय घेतल्यावरुन काँग्रेस टीका करत आहे. मात्र, हे श्रेय घेण्याची सुरुवात देखील काँग्रेसने घेतल्याचा आरोप त्यांनी केला. १९७१ ला पाकिस्तानसोबत युद्ध जिंकले आणि श्रेय घेण्यासाठी काँग्रेसने चक्क लोकसभा तहकूब केली आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या होऊ लागला आणि याचा खर्च हा त्या राज्याला उचलावा लागतोय, असा आरोप देखील बागडे यांनी केला.


या निवडणुका एकत्र कराव्यात, असा मोदी सरकारचा आग्रह आहे. हा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जाऊ शकतो. भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण दिले. भाजपच्या पाठिंब्यावर असलेल्या व्ही.पी. सिंग सरकारने ओबीसींना मंडल आयोग लागू केले. सर्व क्षेत्रात सामाजिक न्यायाची भुमिका भाजप सरकारने घेतली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी रावसाहेब पाटील दानवे यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन बागडे यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details