महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 26, 2022, 1:29 PM IST

ETV Bharat / state

Raosaheb Danve : मी खूप खस्ता खाऊन इथेपर्यंत आलो, मात्र डॉ कराड यांचे तसे नाही, दानवे यांनी घेतली फिरकी

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभात ( Raosaheb Danve on speaks his own struggle ) रावसाहेब दानवे यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांची फिरकी घेताना दिसून आले. नवनिर्वाचित सरपंचांना महत्वाच्या गोष्टी समजावून सांगताना राजकारणातले मोलाचे सल्लेही ( Valuable advice in politics ) दिले. भारतातील कला व संस्कृती जगभरात पोहोचणार ( Indias art and culture will reach world ) आहे. हीच पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे असे कौतुक त्यांनी केले.

Raosaheb Danve
भाजप नेते रावसाहेब दानवे

दानवे यांची टोलेबाजी

औरंगाबाद : भाजप नेते रावसाहेब दानवे ( BJP leader Raosaheb Danve ) आपल्या शैलीत विरोधकांना टोलेबाजी करत असतात. मात्र यावेळी आपल्याच पक्षातील नेत्यांची फिरकी घेताना दिसून आले. मी खूप खस्ता खाल्ल्या खूप अपमान सहन केला. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचलो. आमचे डॉ. कराड नशीबवान आहेत, असे दानवे म्हणाले. ( Raosaheb Danve on speaks his own struggle ) भारतीय जनता पक्षाने आयोजित (In felicitation ceremony organized ) केलेल्या ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या सत्कार समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Union Minister of State for Finance Bhagwat Karad ) यांची फिरकी घेतली. त्यावेळी दानवे यांनी भाजपने केलेल्या संघर्षाची काही उदाहरणे दिली. (organized by Bharatiya Janata Party )

भाजपने केला सरपंचांचा सत्कार :गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येणाऱ्या भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपकडून औरंगाबादच्या संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, भाजपाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे व इतर नेते उपस्थित होते.


फुकट काही मिळत नाही :यावेळी बोलतांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपला राजकीय अनुभव सांगतानाच नवनिर्वाचित सरपंचांना महत्वाच्या गोष्टी समजून सांगताना राजकारणातले मोलाचे सल्लेही दिले. गावातील जनतेच्या लहान मोठ्या समस्या सोडवण्यावर नवनिर्वाचित भाजपा सरपंचांनी भर द्यावा. वृक्षारोपण, पंतप्रधान किसान सन्मान योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचतील यासाठी काम करावे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तर त्या सहन कराव्यात. आयत काहीच मिळत नाही, आंदोलन करताना, लोकांच्या समस्या सरकार समोर मांडताना अनेकदा तुरुंगात ही जावे लागते, मी अनेकदा तुरुंगात गेलो असे त्यांनी सांगितले.


भाजपचे 25 वर्षांचे नियोजन :80 च्या दशकात दोन खासदारांचा असलेला पक्ष आता देशभरात सत्तेत आहे. जनतेची सेवा केली, त्यांची कामे केली की जनता विसरत नाही असेही त्यांनी सांगितले. मी 44 वर्षापासून राजकारणात आहे, 35 वर्षे मी आमदार किंवा खासदार म्हणून निवडूण येत आहे. ज्यावेळी कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर व्हायचा व त्या वर्षापुरत नियोजन केल जायचे, आता केंद्रात मोदी सरकार आहे. पंतप्रधान मोदींनी आतापासूनच 25 वर्षांचे म्हणजेच 2047 पर्यंतचे नियोजन केले आहे. जी 20च्या निमित्ताने भारत जगातील 20 शक्तीशाली देशांच नेतृत्व करणार आहे, आतापर्यंत ज्या ज्या देशांनी जी 20 परिषदेत नेतृत्व केल आहे, त्यांच्या एक किंवा दोन शहरात या देशांच्या प्रतिनिधींच्या बैठका झाल्या आहेत, मात्र भारतातील 56 शहरात जवळपास 200 बैठका होणार आहे. यानिमित्ताने भारतातील कला व संस्कृती जगभरात पोहोचणार आहे. हीच पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे असे कौतुक त्यांनी केले.

मनमाड ते औरंगाबाद रेल्वे मार्गाच विद्युतीकरण :मार्च अखेरपर्यंत मनमाड ते औरंगाबाद रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण (Electrification of railway line ) पुर्ण होईल तसेच रेल्वे मार्गाच दुहेरीकरणाच 1000 कोटींचे काम सुरु झाले आहे. येणाऱ्या 15 दिवसात जालना व औरंगाबादच्या रेल्वे स्थानकांच्या प्रत्येकी 200 कोटी रूपयांच्या निविदा निघणार आहे, अशा विकासाच्या मोठ्या योजना मराठवाड्यात आणल्या जात आहे, असे देखील रावसाहेब दानवे यांनी सांगितले.


ABOUT THE AUTHOR

...view details