महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युतीच्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीचेच सरकार येणार - रावसाहेब दानवे

प्रत्येक पक्षाला वाटते की, आपली ताकद वाढावी आणि तसा तो प्रयत्न करत असतो. काहीही असले तरी सरकार महायुतीचेच येणार आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्या जनमताचा आदर करणे, हे दोन्ही राजकीय पक्षांचे काम आहे, असे रावसाहेब दानवेंनी सांगितले.

रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना

By

Published : Nov 4, 2019, 8:54 PM IST

औरंगाबाद- युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे. त्याप्रमाणेच सत्ता स्थापन होईल आणि सरकार महायुतीचेच येईल, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला. सेना भाजपची युती 30 वर्षे जुनी आहे. ही युती निवडणूकपूर्व असल्याने सत्ता स्थापनेसाठी काही अडचण असणार नाही, असेही दानवेंनी सांगितले.

रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना

हेही वाचा - कॅन्सरग्रस्तांसाठी युवतीने केले आपले केस दान

प्रत्येक पक्षाला वाटते की, आपली ताकद वाढावी आणि तसा तो प्रयत्न करत असतो. काहीही असले तरी सरकार महायुतीचेच येणार आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्या जनमताचा आदर करणे, हे दोन्ही राजकीय पक्षांचे काम आहे. आमच्या दोघांपैकी कोणीही बाहेर जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी तयार केला आहे. 2014 ची निवडणूक वगळता हाच फॉर्म्युला वापरला गेला. त्यामुळे त्यानुसारच सरकार स्थापन होईल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - जुळ्या मुलींना आयसीयूत सोडून मातेचे पलायन

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या चर्चा चुकीच्या असून तसे काही होणार नाही. आमचं जे ठरलयं ते लवकरच दोन्ही पक्ष सर्वांसमोर ठेवतील, असे दानवेंनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details