औरंगाबाद - मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम ६ महिन्यात सुरू होणार आहे. तसेच औरंगाबादकरांची मागणी लक्षात घेता, मुंबईसाठी दररोज एक नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही रेल्वे लवकरच सुरू करण्यात यश येईल, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थपक गजानन मल्या यांनी औरंगाबाद दौऱ्याप्रसंगी दिली.
रेल्वे महाव्यवस्थापकाचा औरंगाबाद दौरा; मॉडेल रेल्वेस्थानकाचे काम ६ महिन्यात सुरू - DEMAND
गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्थानकांचे काम अपूर्ण आहे, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पुढील टप्प्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी दररोज रेल्वे सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने विचार सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मॉडेल रेल्वेस्थानकांचे काम अपूर्ण आहे, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात मॉडेल रेल्वेस्थानकाच्या पुढील टप्प्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मुंबईसाठी दररोज रेल्वे सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने विचार सुरू आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काळात मुंबईसाठी एक रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे यावेळी मल्या यांनी सांगितले. औरंगाबाद रेल्वे स्थानकाची पाहणी करताना परिसरातील एका चेंबरमधून घाणपाणी वाहत होते, मल्या यांना त्याच पाण्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे मॉडेल रेल्वेस्थानकाचे स्वप्न पाहणारे औरंगाबाद स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत किती मागासलेले आहे. याची कल्पना मल्या यांना नक्कीच आली.