महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढी वारीनिमित्त पायी वारी करण्याचा आनंद वेगळाच...

आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पायी जाण्याचा आनंद वेगळाच आहे. त्याला आम्हाला दोन वर्षापासून मुकावे लागते असल्याची खंत शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी पालखी वाले यांनी व्यक्त केली.

By

Published : Jun 11, 2021, 5:13 PM IST

प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी
प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी

औरंगाबाद - महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पायी जाण्याचा आनंद वेगळाच आहे. त्याला आम्हाला दोन वर्षापासून मुकावे लागते असल्याची खंत शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी पालखी वाले यांनी व्यक्त केली. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आषाढी वारीनिमित्त पायी वारी करण्याचा आनंद वेगळाच...

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे देवस्थान मानले जाणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांची ही मानाची पालखी असते गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र जे वारकरी भाविक भक्त या पालखी सोहळ्यास सामील होतात. पैठण तिथे गाव पवित्र करत पालखी पंढरपूरला पोचायची मात्र शासनाच्या ह्या वर्षीच्या निर्णयानुसार वारी पाणी न जाता बसमध्ये जाणार आहे. 1 जुलैला पैठणहून प्रस्थान करतात तर 19 जुलाई ला पंढरपूरला पोहोचेल. दरवर्षी पायी जाणारी ही पालखी याहीवर्षी बसने जाणार असल्यामुळे रघुनाथ बुवा गोसावी पालखी वाले यांनी खंत व्यक्त केली आहे.

शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांची मानाची पालखी

कोरोना चाचणी बंधनकारक -

मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे. प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचे पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असे देखील पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details