औरंगाबाद-मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. रात्री झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री अचानक सुसाट वारे वाहू लागले. विजेचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली.
औरंगाबादसह परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास दोन तास पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे उष्ण असलेल्या वातावरणात बदल झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. रविवारी रात्री आणि सोमवारी मध्य रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नागरिकांची धावपळ झाली.