महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2019, 5:36 PM IST

ETV Bharat / state

अखेर 'तेच' झालं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच अभिनंदन - प्रकाश जावडेकर

राज्यात भाजप सरकार अस्तित्वात यावं असा जनतेने कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने गद्दारी केली व ज्या काँग्रेसला जनतेने नाकारलं, त्यांच्या सोबत शिवसेना गेली.  असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंभिनंदन केले आहे.

प्रकाश जावडेकर

औरंगाबाद - राज्यात भाजप सरकार अस्तित्वात यावं असा जनतेने कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने गद्दारी केली व ज्या काँग्रेसला जनतेने नाकारलं, त्यांच्या सोबत शिवसेना गेली. असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच अभिनंदन - प्रकाश जावडेकर

हेही वाचा -#MaharashtraGovtFormation: अजित पवारांकडे 54 आमदारांच्या सह्यांचा कागद; शरद पवारांना संशय

जावडेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना सोबत गेला तर योग्य आणि त्यांचे आमदार आमच्यासोबत आले तर गद्दारी हा दुहेरी न्याय कसा चालेल? असा प्रश्न प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातल्या जनतेचा अवमान शिवसेनेने केला आहे. ज्यांनी सवरकरांचा विरोध केला, राम मंदिराचा विरोध केला. ज्यांच्या भ्रष्टाचारामुळे देश खिळखिळा झाला अश्या काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. तसेच निवडणुकीत मोदींच्या नावाने मत मागितली. महायुतीच्या नावावर प्रचार केला. आणि जनादेश मिळाल्यावर मात्र सरकार स्थापन करण्यास विरोध केला असल्याचे जावडेकर यावेळी म्हणाले.

तसेच खरंतर आजच्या घटनेचे स्वागत करायला हवं राज्यात आता स्थिर सरकार राहील. राज्यात आनंदाचे वातावरण असल्याचा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी औरंगाबादेत व्यक्त केला.

हेही वाचा - कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details