महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangzeb controversy : प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला वाहली फुले, नव्या वादाला फोडले तोंड - प्रकाश आंबेडकर यांची शिवसेना युतीवर भाष्य

प्रकाश आंबेडकर हे काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यांच्या या कबर भेटीमुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर

By

Published : Jun 18, 2023, 8:27 AM IST

Updated : Jun 18, 2023, 8:36 AM IST

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्यभरात औरंगजेबाच्या नावावरून राजकारण सुरू आहे. सर्वत्र या नावावरुन तणाव असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची भेट घेतली. या कबर भेटीमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान तेथील लोकांची श्रद्धा असल्याने आल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्याविषयीही विधान केले, ज्यामुळे ठाकरे गटासोबत केलेल्या युतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जयचंदमुळे 200 वर्ष पारतंत्र्य : औरंगजेबाच्या कबरीवर दर्शन घेतल्यामुळे शिवसेनेसोबत असलेल्या जवळीक वर परिणाम होईल का याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली. राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, या कोणी घडवल्या याचे उत्तर सगळ्यांना माहित आहे. आम्ही औरंगजेबाच्या दरबारात कधीही चाकरीला देखील नव्हतो, तिथे जयचंद कोण होते? हे सर्वांना माहीत आहे. इंग्रजांच्या काळात देखील याच जयचंदमुळे 200 वर्ष आपल्याला पारतंत्र्यात राहावे लागले, अशी टीका प्रकाश आंबेडकर केली. तसेच त्यांनी शिवसेना आणि त्यांच्या युतीवर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखे आहे. बाळासाहेबांनी सत्तेसाठी जे जे करावे लागले ते त्यांनी केले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

अनेक ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रयत्न : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद तालुक्यात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. तसेच खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूतीच्या मंदिरालाही भेट दिली. प्रकाश आंबेडकर हे काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित लावली होती. त्याचबरोबर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. काही दिवसांपासून औरंगजेबावरुन वाद चालू आहे. अशात प्रकाश आंबेडकरांनी कबरीला भेट दिली आहे. यामुळे वाद फेटण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कबरीचे हे दर्शन नसून भेट आहे. तसेच हा ज्यांचा त्यांचा श्रद्धेचा प्रश्न असल्याचे सांगत आपण जनसामान्यांच्या श्रद्धेला मान दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.

हेही वाचा -

  1. Bhima Koregaon Case: ॲड. प्रकाश आंबेडकरांचे भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांच्या बाबत केली मोठी मागणी
  2. Maharashtra politics: राज्य राजकीय धमाक्याने गाजतंय, प्रतीक्षा दिल्लीच्या धमाक्याची
  3. Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा ठाकरेंना झुकते माफ, वंचितबाबत मोठा निर्णय?
Last Updated : Jun 18, 2023, 8:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details