औरंगाबाद- वामन हरी पेठे ज्वेलर्समधून कोट्यवधी रुपये किमतीच्या सुवर्णालंकाराची हेराफेरी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी राजेंद्र जैनकडून अल्पदरात चोरीचे सोने खरेदी केल्याच्या संशयावरून शहरातील एका सराफ दुकान मालकाला विशेष तपास पथकाने अटक केली आहे. राजेश ऊर्फ राजू सेठिया असे सराफ दुकाण मालकाचे नाव असून सुवर्ण अलंकार हेराफेरी प्रकरणातील ही चौथी अटक आहे.
सेठिया याचे सराफ्यात जडगाववाला ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. आरोपी राजेंद्र जैन याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने काही किलो सोन्याचे दागिने जडगाववाला ज्वेलरसचा मालक राजेश सेठिया याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राजेश सेठिया याला ताब्यात घेतले.