औरंगाबाद- लॉकडाऊनच्या काळात पोलीस कशाचीही पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरत आहेत. अशात कन्नड शहरात सेवा बजावणाऱ्या पोलिसांवर अंधानेर ग्रामपंचायतीच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच उन्हापासून पोलिसांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतीतर्फे पोलिसांना शालीचे वाटप करण्यात आले.
'कोरोना वॉरियर्स'ला अंधानेर ग्रामपंचायतीचा सलाम, कन्नड पोलिसांवर पुष्पवृष्टी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. यात प्रामुख्याने वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, आणि पोलीस प्रशासन हे जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. अशात कन्नड तालुक्यातील अंधानेर या छोट्याशा ग्रामपंचायतीने कर्तव्य बजवणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी पोलिसांवर पुष्पवृष्टी केली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. यात प्रामुख्याने वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, आणि पोलीस प्रशासन हे जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत. काही ठिकाणी पोलिसांवर हल्लेदेखील होत आहेत. अशात कन्नड तालुक्यातील अंधानेर या छोट्याशा ग्रामपंचायतीने कर्तव्य बजवणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी पोलिसांवर पुष्पवृष्टी केली.
याच कारणामुळे अंधानेर ग्रामपंचायतीचे सध्या कौतुक होत आहे. या कार्यक्रमासाठी कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्र्वर रेंगे, भुषण सोनार, कैलास करवंदे, सरपंच कांताबाई दाबके, ग्रामसेवक पगारे बापू, तलाठी अर्जुन महाजन यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.