औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला औरंगाबादेत अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडकीत, गॅलरीत येऊन दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावून एकजुटीचे दर्शन दिले.
दिवे लावत औरंगाबादकरांनी दिले कोरोनाविरोधात एकजुटीचे दर्शन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबादेतील उल्कानगरी भागात नागरिकांनी घरातील लाईट घालवून गॅलरीत येत दिवे, पणती, मोबाईचे टॉर्च लावत कोरोनाविरोधात एकजुटीचे दर्शन घडविले.
पणती
औरंगाबादच्या उल्कानगरी परिसरातील ऑगस्ट होम या कॉलनीत नागरिकांनी आपल्या घरातील दिवे नऊ मिनिटे बंद करून सर्व परिसर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्चच्या उजेडाने प्रकाशमय केले. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येकाला सलाम नागरिकांनी केला.
हेही वाचा -मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी, औरंगाबादमधे एकाचा मृत्यू