औरंगाबाद- किरकोळ वादातून शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत शिवसेनेचे पिंपळवाडी पंचायत समिती सदस्याचा उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. संतोष विनायक माळी (रा.इसारवाडी, ता.पैठण) असे मृताचे नाव आहे.
शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा मारहाणीत मृत्यू - रूग्णालय
गुरुवारी किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी शिवसेनेचे पिंपळवाडी पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांच्यावर हल्ला चढविला होता. तर उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी माळी यांच्यावर हल्ला चढविला होता. यामध्ये संतोष माळी, अशोक माळी, दत्तू माळी असे तिघेजण जखमी झाले होते. तर त्यामध्ये पंचायत समिती सदस्य संतोष यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
तर उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती पैठणला धडकताच शेकडो आप्त नातेवाईकांनी माळी यांच्या निवासस्थानी गर्दी करीत आहेत. त्याचबरोबर शिवसेना कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात अंत्यविधीसाठी निवासस्थानी दाखल होत आहेत. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस परिसरात लक्ष ठेऊन आहेत. याप्रकरणी दुपारपर्यंत एमआयडीसी पैठण पोलीस ठण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.