औरंगाबाद - बाबतारा येथील रोडवर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने मोबाईल, टॅब व बँकेची कागदपत्रे लुटल्या याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पोलिसांनी अधिक तपास केला असता तक्रारदारच लुटीचा बनाव करत असल्याचे समोर आले आहे. अखेर तक्रारदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सुरेश शेलार (वय २० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.
...म्हणून रचला लुटीचा बनाव; तरूण अटकेत - police
बँकेतील अधिकारी रागावतील व नोकरीवरुन काढून टाकतील या भीतीने तरूणाने चोरीचा बनाव केला होता.
अजय हा क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, शाखा वैजापूर येथे बँक कर्मचारी म्हणून काम करत होता. अजयने २३ मे रोजी लाडगाव येथे पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या जवळील मोबाईल, टॅब व बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे बळजबरीने हिसकावून नेल्याची तक्रार दिली होती.
याबाबत विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्या पाठीमागे ठेवलेल्या बॅगची बंद तुटल्याने बॅगेतील कागदपत्रे व मोबाईल गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बँकेतील अधिकारी रागावतील व नोकरीवरुन काढून टाकतील या भीतीने, अशी माहिती पोलिसांना दिली असल्याचे त्याने सांगितले. ही कामगिरी विरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व जमादार धनुरे यांनी केली आहे.