औरंगाबाद- जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात आणखी 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 11 वर पोहचली आहे.
औरंगाबादेत कोरोनाचा आणखी एक बळी, मृतांचा आकडा 11 वर - corona patient died in aurangabad
भडकल गेट येथील 65 वर्षीय वृद्धाला त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. 28 तारखेला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
भडकल गेट येथील 65 वर्षीय वृद्धाला त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. 28 तारखेला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान आज सकाळी 8 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाबसह इतर काही समस्या होत्या.
सकाळी 24 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 321 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा बळी गेला आहे. मागील महिन्याभरात कोरोनाचे 11 बळी गेले आहेत. त्यामुळे, औरंगाबदमधील नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.