औरंगाबाद - दोन चुमुकल्याच्या मातेने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलोनी येथे उघडकीस आली. मीरा राजू मिसाळ (वय 29 रा.सातारा परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचा नाव आहे.
दोन चिमुकल्यांच्या मातेने गळफास घेत केली आत्महत्या - thane
मीरा या हाऊस वाईफ असून, त्यांचे पती हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते.
मीरा या हाऊस वाईफ असून, त्यांचे पती हे खाजगी कंपनीत नोकरी करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान ते घरी आले असता खालच्या खोलीत आईसोबत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती मात्र पत्नी दिसत नसल्याने त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता पत्नी मीरा यांनी साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना देताच सतारा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मीरा यांना फासावरून खाली उतरवून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दोन मुलाच्या मातेने आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार के. बी. पवार करत आहेत.