गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूर लासूर मार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोर ( Government Rest House Lasur ) दोन दुचाकीचा समोरासमोर ( One killed, one seriously injured in wheel accident ) ) अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर, ( Bike accident ) एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव रामदास भिकनदास वैष्णव असून, सुभाष चुंगडे असे गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दुचाकीची समोरासमोर धडक -गंगापूर लासुरमार्गावर गंगापूर शहराजवळील शासकीय विश्रामगृह समोर दोन भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. होंडा कंपनीची शाईन क्रमांक MH 20 EV 9481, हिरो कंपनीची स्प्लेंडर क्रमांक MH 20 FH 3394 या दोन भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे.