औरंगाबाद - मोंढा नाका उड्डाणपुलावर आकाशवाणीकडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सहा वाहनांमध्ये सोमवारी दुपारी विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
औरंगाबादमध्ये सहा वाहनांचा विचित्र अपघात; रिक्षा चालक जखमी - मोंढा नाका उड्डाणपुल
मोंढा नाका उड्डाणपुलावर आकाशवाणी कडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सहा वाहनांमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली.
आकाशवाणी ते क्रांती चौक रस्त्यावरील मोंढा नाका उड्डाण पुलावरून सहा वाहने एकाच लेनमधून जात होती. यावेळी समोरच्या गाड्यांनी ब्रेक लावल्याने मागे असणाऱ्या रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा शेजारच्या गाडीवर धडकली. या अपघातात रिक्षाची समोरची काच फुटल्याने चालक जखमी झाला आहे. तर इतर पाच वाहनेही एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर रिक्षाचालकावर प्रथमोपचार केरण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ग्रस्त वाहनचालकांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देत त्यांनी वाहतूक सुरळीत केली.