महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये ट्रॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू

तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली एकजण दबून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला होता. यात चालक नवनाथ अशोक विघेचा (वय 36) मृत्यू झाला आहे.

By

Published : Dec 1, 2019, 2:09 PM IST

One died in tractor accident at Aurangabad
औरंगाबादमध्ये टॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू

औरंगाबाद -तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली एकजण दबून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला होता. यात चालक नवनाथ अशोक विघेचा (वय 36) मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - ठाणे-बेलापूर मार्गावर शिवशाही बसचा अपघात

कापूसवाडगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने मृत चालकाला बाहेर काढून वैजापूर उपरुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चालकाची तपासणी करून मृत घोषित केले. नवनाथ हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - हरियाणाकडे जाणाऱ्या भाविकांचा राजस्थानमध्ये अपघात, लातुरातील 5 तर उस्मानाबादेतील एकाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details