औरंगाबाद ( पैठण ) -पाचोड-पैठण रस्त्यावरील थेरगाव, लिंमगाव फाट्या जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. संजय पंढरीनाथ गायवाड असे मृताचे नाव आहे. तर नारायण काकासाहेब भांड हे जखमी आहेत.
पाचोड येथे रविवारी आठवडी बाजार असल्यामुळे काही कामानिमित्त संजय पंढरीनाथ गायकवाड (वय 38 वर्ष रा.कोळीबोडखा) आणिम नारायण काकासाहेब भांड (वय ४६ रा.वडजी ता.पैठण) हे
दोघेही आपले दैनंदिन कामे आटोपून आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.२०.७९६१) वडजीकडे जात होते. त्यावेळी लिंमगाव फाटा जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना समोरून धडक दिली. या अफपघातामध्ये गायकवाड यांची दुचाकी पन्नास फूट फरफटत गेली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तर एक गंभीर जखमी - road accident
पैठण रस्त्यावरील थेरगाव फाटा-लिंमगाव फाट्या जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला
जखमी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात भरती-
अपघातात संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर भांड गंभीर जखमी अवस्थेत तब्बल अर्धा तास घटनास्थळीच पडून होते. कोणीही या जखमीला दवाखान्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला नाही. अर्ध्या तासानंतर रस्त्यावरून येणाऱ्या एका व्यक्तींने भांड यांना खालगी वाहनाद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद घाटी रुग्णलायत पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.