औरंगाबाद - साडेदहा लाख रुपयांच्या गृहकर्जाचे आमिष दाखवून एका जणाला १ लाख ५४ हजार ४३० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये रिया सिंग, सचिन पाटील आणि दोन अन्य आरोपींचा समावेश आहे.
औरंगाबादेत गृहकर्जाचे आमिष दाखवून एकाला दीड लाखाचा गंडा - सिडको पोलीस ठाणे
चिकलठाणा येथील रहिवासी गणेश दगडूशेठ हे गृहकर्जासाठी विविध फायनान्स कंपन्यांकडे चौकशी करीत होते. दरम्यान जून महिन्यात त्यांच्या मोबाईलवर रिया सिंग नावाच्या महिलेने फोन करून बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.
चिकलठाणा येथील रहिवासी गणेश दगडूशेठ हे गृहकर्जासाठी विविध फायनान्स कंपन्यांकडे चौकशी करीत होते. दरम्यान जून महिन्यात त्यांच्या मोबाईलवर रिया सिंग नावाच्या महिलेने फोन करून बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला गृहकर्जाची आवश्यकता असल्याने आमच्या मुख्य कार्यालयातून सचिन पाटील हे तुमच्याशी संपर्क साधतील, असे ती म्हणाली. त्यानंतर सचिन पाटील यांनी दगडूशेठ यांच्याशी संपर्क साधून तुमच्या कर्जाची फाईल मंजुरीसाठी आली असल्याचे सांगितले.
कंपनीच्या नियमानुसार तुम्हाला वर्षाला एक लाख पाच हजार रुपये वार्षिक विमा हप्ता असलेली पॉलिसी घ्यावी लागेल. तसेच तुम्हाला सहामाही अथवा त्रैमासिक हप्ता तात्काळ भरावा लागेल, असे तो म्हणाला. त्यामुळे दगडूशेठ यांनी १२ जूनला एका संकेतस्थळावर २५ हजार रुपये जमा केले. दुसऱ्या दिवशी १३ जूनला २ जण त्यांच्या घरी आले. त्यांनी विमा पॉलिसीचा फॉर्म भरून घेतला. तसेच त्यांच्याकडून विविध कागदपत्रे घेऊन गेले. तसेच वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. दीड लाख रुपये भरल्यानंतर कुठल्याही कर्मचाऱ्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे दगडूशेठ यांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी सिडको ठाणे गाठत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.