महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याची थकबाकी भरा अन्यथा पाणी बंद, पाटबंधारे विभागाची पालिकेला नोटीस

महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी जायकवाडी धरणातून दररोज सुमारे दीडशे मिली पाणी उपसा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात उपसा करण्यासाठी लागणार बिल आकारले जाते, मात्र पालिकेने भरल नाही. पालिकेने पाणी बिलाची थकबाकी रक्कम न भरल्यास टप्प्याटप्प्याने जायकवाडीतून पाणी उपसा बंद केला जाईल असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

पाण्याची थकबाकी
पाण्याची थकबाकी

By

Published : Feb 17, 2022, 10:17 AM IST

औरंगाबाद- महानगरपालिकेने पाटबंधारे खात्याकडे पाणी बिलाचे भरणा केला पाणी. त्यामुळे आता शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी बिलाची थकबाकी 26 कोटी 32 लाखांवर पोहोचली असून, पाटबंधारे विभागाने 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी भरणा केला नाही तर 21 फेब्रुवारी पासून पाणी उपसा बंद करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

पाणी उपसा बंद करण्याचा इशारा -

महानगरपालिकेच्या वतीने शहरासाठी जायकवाडी धरणातून दररोज सुमारे दीडशे मिली पाणी उपसा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात उपसा करण्यासाठी लागणार बिल आकारले जाते, मात्र पालिकेने भरल नाही. पालिकेने पाणी बिलाची थकबाकी रक्कम न भरल्यास टप्प्याटप्प्याने जायकवाडीतून पाणी उपसा बंद केला जाईल असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामध्ये 21 फेब्रुवारी रोजी पाणी उपसा दोन तासांसाठी बंद केले जाईल, 22 फेब्रुवारी चार तास 23 फेब्रुवारी रोजी सहा तासांसाठी, 24 फेब्रुवारीपासून आठ तासांत करिता तर 25 फेब्रुवारी पासून पूर्ण पाणी पुरवठ्याचा उपसा बंद केला जाईल असा इशारा पाटबंधारे खात्याने महानगरपालिकेला पाठवलेल्या नोटीस मध्ये सांगितले आहे.

जायकवाडी धरणामधून शहराला पाणी पुरवठा -

औरंगाबाद शहराला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या असून दोन पाणी योजना त्याच्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करताना राज्यातील सर्वाधिक पाणीपट्टी कर हा लावला जातो. मात्र महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाला शुल्क भरण्यास टाळाटाळ केली जाते. नोटीस मिळाल्यावर काही किरकोळ रक्कम ही भरली जाते. त्यामुळे आता थकबाकी थेट 26 कोटी 32 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महानगर पालिकेला नोटीस पाठवून 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे न झाल्यास 21 फेब्रुवारीपासून पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरावर पाणी संकट येण्याची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details