महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊन'काळात हॉटेलमध्येच रंगवला जुगाराचा खेळ, 9 जुगारी ताब्यात - रविकिरण लॉजिंग अॅण्ड बोर्डींग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात हॉटेल, लॉज बंद ठेवण्याच्या सुचना प्रशानाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, आर्थिक फायद्यासाठी सेव्हनहिल परिसरात असलेल्या रविकिरण हॉटेलमध्ये जुगाराचा खेळ रंगला होता. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत हॉटेल मालकासह ९ जणांना अटक केली आहे.

अटकेतील आरोपी
अटकेतील आरोपी

By

Published : Jun 29, 2020, 11:52 AM IST

औरंगाबाद - हॉटेल मालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रविकिरण या स्वतःच्या मालकीच्या हॉटेल मध्येच जुगाऱ्यांना पत्ते खेळण्यासाठी जागा दिली. या प्रकरणी हॉटेल मालक महेश राणासह 9 जणांना रविवारी (दि. 28 जून) सेव्हनहील येथून पुंडलीकनगर पोलिसांनी अटक केली.

महेश राणा याचे सेव्हनहिल परिसरात रविकिरण लॉजिंग अॅण्ड बोर्डींग नावाचे हॉटेल आहे. सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात लॉजिंग सुरू करण्यास शासनाने मनाई केली आहे. पण, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राणा याने रविकिरण हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील 205 क्रमांकाच्या खोलीत 9 जुगाऱ्यांना पत्ते खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ही माहिती पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना कळताच त्यांनी हॉटेलवर छापा टाकला.

यावेळी जुगार खेळणाऱ्या अमोल मधुकरराव शेलार, किशोर रमेश उणे, रफिक खान नूर खान, विनोद सुधाकर चाकूर, प्रभाकर किसन रणदिवे, गौतम विश्वनाथ खंदारे, आकाश काशीराम चिकोले, भगवान रामप्रसाद अवचार, रोहिदास रामचंद्र कस्तुरे, नुरोद्दीन खमरोद्दीन यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 79 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस कर्मचारी विनायक कापसे, विकास खटके, पोह रमेश सांगळे, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, जालिंदर मांटे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा -औरंगाबाद : कोरोनाची स्थिती नियंत्रणात का नाही ? प्रशासकीय यंत्रणेला खंडपीठाचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details