औरंगाबाद- लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात 22 वर्षीय नवविवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात घडली. संजीवनी तेजस देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे.
लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या - फुलंब्री
लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात 22 वर्षीय नवविवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात घडली.
मृत संजीवनी
मृत संजीवनीचा ३१ मे, २०१९ ला थाटामाटात लग्न पार पडले होते. लग्नाला अवघे दीड महिने होत नाहीत तर संजीवनीने राहत्याघरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विवाहितेवर घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. मात्र, सासरच्या जाचाला कंटाळून संजीवनीने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली