औरंगाबाद– जिल्ह्यात रोज किमान शंभर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवारी सकाळी 163 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 819 झाली आहे.
नव्याने वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण हे मनपा क्षेत्रांतील आहेत. तर 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात 2 हजार 46 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 203 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित 1 हजार 570 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालाप्रमाणे नव्या कोरोनाबाधितांची नोंद
शिवाजी नगर (4) सिडको एन चार, जय भवानी नगर (1), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (4), बायजीपुरा (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), सिडको (1), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (1), उत्तम नगर (1), समर्थ नगर (1), म्हाडा कॉलनी (1), अरिफ कॉलनी (1), कोटला कॉलनी (1), उस्मानपुरा (1), एन नऊ सिडको (3), अंबिका नगर (1), पडेगाव (1), भानुदास नगर (7), न्यू नंदनवन कॉलनी (1), विष्णू नगर (1), उल्का नगरी (1), पद्मपुरा (5), क्रांती नगर (1), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), एन पाच सिडको (2), एन सहा, मथुरा नगर (3), गजानन नगर (6), औरंगपुरा (1), जय भवानी नगर (8), एन सहा, संभाजी कॉलनी (1), नानक नगर (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), एन सहा सिडको (2), सेवा नगर हाऊसिंग सोसायटी (1), राज हाइट, सेव्हन हिल जवळ (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), भगतसिंग नगर (3), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), कॅनॉट प्लेस (1), न्यू विशाल नगर (1), श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी (1), राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी (1), मुकुंदवाडी (2), मयूर नगर (1), अयोध्या नगर (2), बौद्धवाडा चिकलठाणा (1), चिकलठाणा हनुमान चौक (2), सुरेवाडी (1), विजय नगर (2), गारखेडा परिसर (1), रशीदपुरा (1), सिडको महानगर दोन, वाळूज (4), जय गजानन नगर (1), अन्य (1), कैलास नगर (1), एन दोन सिडको (3), जोहरीवाडा, गुलमंडी (1), राजेसंभाजी नगर (1), बन्सीलाल नगर (1), रमा नगर (1), हनुमान नगर (2), सातारा परिसर (1), मयूर पार्क (1) या भागांतील कोरोनाबाधित आहेत. तर ग्रामीण भागात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मांडकी (2), सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (2), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (5), ओयासिस चौक, पंढरपूर (1), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (1), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), सारा गौरव, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (1), एन अकरा, मयूर नगर, हडको (2), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (1), वडगाव (1), विराज हाईट, बजाज नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), करमाड (6), फत्तेह मैदान, फुलंब्री (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), कोलघर (2), गजगाव, गंगापूर (1), लासूर नाका,गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), शिवूर बंगला (2), कविटखेडा, वैजापूर (1), शिवूर (5), मधला पाडा, शिवूर, वैजापूर (1) या भागांतील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये 55 स्त्री व 108 पुरुष आहेत.
अशी आहे मृतांची आकडेवारी-
घाटी रुग्णालयामध्ये गोरखेडागाव येथील 66 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा, रोशन गेट येथील 73 वर्षीय पुरूष, गारखेडा येथील 70 वर्षीय पुरुष, कैसर कॉलनीतील 25 वर्षीय स्त्री, हनुमान नगर, पुंडलिक नगर येथील 36 वर्षीय स्त्रीचा मृत्यू झाला आहे. तर सिल्लोड येथील 55 वर्षीय पुरुष, राजा बाजार येथील 62 वर्षीय पुरुष, उत्तम नगरातील 49 वर्षीय पुरुष आणि कोहिनूर कॉलनीतील 59 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील खासगी रुग्णालयात एन नऊ सिडकोतील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा, हर्सुल परिसरातील 71 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष, पैठण गेट येथील 31 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत जिल्ह्यातील 149, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 53, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट-
जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. अनलॉक झाल्यावर कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. त्यामुळे, जिल्हा परिषदेने विशेष उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना तपासणीसाठी शहरात आणले जाते. यामध्ये रुग्णासोबत असलेल्या लोकांना बाधा होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.