औरंगाबाद - शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील दोन वाघ मुंबईच्या वीर जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (भायखळा प्राणीसंग्रहालय) पाठवण्यात येणार आहेत. या दोन वाघांच्या बदल्यात सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला विविध पक्षी दिले जाणार आहेत, अशी माहिती सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी रविवारी दिली.
औरंगाबाद महानगरपालिका संचलित सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. येथे वाघांची संख्या जास्त असल्याने वाघ-पक्षी देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, बी एस नाईकवाडे यांनी सांगितले.