औरंगाबाद - शहरातील ५९ केंद्रांवर आज सकाळपासून एमपीएससीची परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी १९ हजार ६४३ उमेदवार परीक्षा देत आहे. यावेळी नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. एका खोलीत २४ उमेदवार असणार आहे.विद्यार्थ्यांना हँडग्लोव्हज, सॅनिटायझरचे दोन पाऊच आणि मास्क देण्यात आले आहे. यासाठी महसूल प्रशासनाने २६०० अधिकारी- कर्मचारी नियुक्त केले आहेत.
एमपीएससी परीक्षेला सुरुवात; लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
एमपीएससी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ज्यावेळी नियमांचे पालन करण्याच्या वारंवार सूचना देखील विद्यार्थ्यांना करण्यात आल्या. तर कडक लॉकडाऊन असल्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
कोरोना रुग्णाची वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शहरातील सर्व हॉटेल दुकाने बंद आहेत. यामुळे बाहेर गवाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरोसोय झाली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून रिक्षाचालकांनी जास्त भाडे आकारले. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. तर परीक्षेसाठी लागणारे साहित्यांची दुकाने बंद असल्याने विद्यार्थ्यांची धांदल उडाली. यामुळे काही ठिकाणी सुरु असलेल्या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.
हेही वाचा-अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे