औरंगाबाद - लोकसभेला मी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना एक लाखांची आघाडी दिली होती. मात्र, त्यांनी विधानसभेला मला मदत केली नाही, असा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्यासमोरच लगावला. याला प्रत्युत्तर देताना, शिवसेना नंतर काय करणार हे माहीत असल्यानेच मदत केली नाही, असा प्रतिटोला दानवे यांनी सत्तार यांना लगावला.
औरंगाबादमध्ये सत्तार अन् दानवे यांची व्यासपीठावर रंगली जुगलबंदी - खासदार रावसाहेब दानवे बातमी
औरंगाबाद येथील पिसादेवी ग्रामपंचायतच्या इमारत लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची जुगलबंदी रंगली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना उत्तर देत राजकीय टोलेबाजी केली. सत्तार आणि दानवे यांनी आरोप-प्रत्यारोमुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले.
त्यावर रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. सत्तार यांचे काही नक्की नाही, कधी कुठे जातील, भाजपामध्ये येता-येता आमचा अपघात झाला. कोविड संपले की आमचे सरकार येणार, सत्तार मला घेऊन फडणवीस यांना भेटण्यासाठी घेऊन जाणार. आमची मैत्री पक्की आहे. सत्तार नेहमी मला मदत करतात, यावेळी मी मदत केली नाही. कारण मला माहीत होतं, निवडणुकीनंतर शिवसेना काय करणार आहे, असा टोला दानवे यांनी लगावला. या टोलेबाजीमुळे उपस्थितांमध्ये हशा फुटला. मात्र दानवे यांनी हसता-हसता दिलेले संकेत भविष्यात खरे होतील का, याबाबत चर्चा मात्र सुरू झाली, हे मात्र नक्की.
हेही वाचा -एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं, मी मध्यस्थी करेन; शिवसेना आमदारांचे वक्तव्य