औरंगाबाद -महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंध जोडल्या जाणाऱ्या सावरकर यांना भारतरत्न कसे देऊ शकता. हा सन्मान द्यायचा असेल तर सुखदेव, भगतसिंग, अश्फाक उल्ला खान, अल्लामा फजलेहक खैराबादी यांना द्या, अशी मागणी एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. प्रत्येक गोष्टीत भाजपने त्यांची विचारधारा आणू नये कारण ते देश हिताचे नाही. असे ही ओवैसी यावेळी म्हणाले.
भारतरत्न द्यायचेच असेल तर सुखदेव, भगतसिंग, अश्फाक उल्ला खान यांना द्या - ओवेसी
महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंध जोडल्या सावरकर यांना भारतरत्न कसे देशकता असे वक्तव्य खासदार ओवेसी यांनी केले. ते औरंगाबाद मध्ये बोलत होते.
सध्या स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांना भारतरत्न देण्याचा जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, गांधी हत्येप्रकरणी चीफ जस्टीस कपूर कमिशनच्या चौकशीत सावरकरांचा संबंध जोडला गेला. अशा व्यक्तीला भारतरत्न सारखा सर्वोच्च सन्मान कसा काय दिला जाऊ शकतो ? हिंदू महासभा व ऑल इंडिया मुस्लीम लीग यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कुठलेच योगदान नव्हते. भारतरत्न द्यायचाच असेल तर तो देशासाठी कार्य केलेल्या सुखदेव, भगतसिंग, अश्फाक उल्ला खान, अल्लामा फजलेहक खैराबादी, यांना देण्यात यावा. भाजपा प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची विचारधारा आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांनी असे करू नये कारण त्याने देशाचे हित साध्य होणार नाही. असे खासदार ओवेसी औरंगाबादेत म्हणाले.