छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) MP Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून अनेक याचिका न्यायालयामध्ये दाखल आहेत, असं असताना मराठवाड्याच्या विकासासाठी कॅबिनेटची बैठक झाल्यावर तुम्ही महागाई, विकास, रस्ते, पाणी याबद्दल बोलले नाही. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही घाणेरडे राजकारण करण्यासाठी या ठिकाणी आले होते. या ठिकाणी शहराचं नाव बदललं आहे. तुमची अपेक्षा ही होती की, आम्ही गुपचूप बसून ते नामांतर स्वीकारू. मात्र, आम्ही सुरुवातीपासून विरोध केला आहे. हा विरोध आमचा कायम असणार आहे, अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी मांडलीय. (Chhatrapati Sambhaji Nagar Renaming)
औरंगाबाद आमची ओळख :आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करत नाही, मी महापुरुषांचा आदर करतो. मात्र, औरंगाबाद नाव ही एक ओळख आहे. जगामध्ये औरंगाबाद नावाचा लौकिक आहे. मात्र तुमचं राजकारण घाणेरडं आहे. तुम्ही हे मुद्दे वारंवार आणता. खुर्ची दूर होत असताना तुम्ही हे मुद्दे आणून भावनिक मुद्द्यांवर वातावरण निर्मिती करत आहात. नामांतराच्या बाबतीत न्यायालयामध्ये पिटीशन दाखल करण्यात आलेल्या आहेत. याबद्दल कोर्टानं अनेकवेळा महत्त्वाचा मुद्दा नाही, म्हणून त्याला पुढची तारीख वाढवून दिलीय. हे मात्र विकासाच्या नावावर मराठवाड्यात आले. इथे येऊन नामांतर केलंय. मात्र, यांनी शहराध्ये येऊन नागरिकांना धोका दिलाय, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. (Chhatrapati Sambhaji Nagar news)