महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : परवानगी नाकारल्यानंतरही मनसैनिकांची वीजबिलाविरोधात आंदोलनाची भूमिका - औरंगाबाद मनसे आंदोलन लेटेस्ट न्यूज

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा देत वीजबिले फाडून वीजवितरण अधिकाऱ्यांच्या तोंडावर भिरकावली होती. वाढीव वीजबिलाबाबत निर्णय घ्या. अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. आता पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी औरंगपुरा भागात आंदोलन केले.

औरंगाबाद वीजबिलाविरोधात मनसे आंदोलन न्यूजMNS agitation news against Aurangabad power bill
औरंगाबाद वीजबिलाविरोधात मनसे आंदोलन न्यूज

By

Published : Nov 26, 2020, 2:23 PM IST

Updated : Nov 26, 2020, 2:42 PM IST

औरंगाबाद - वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक झाली असून, औरंगाबादेत वीजवितरणविरोधात मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीदेखील आंदोलन होणारच, अशी भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी जाहीर केली.

औरंगाबादेत वीजबिलाविरोधात मनसेचे आंदोलन
हेही वाचा -शिक्षक मतदारसंघ : निवडणूक रिंगणात ११, १२वी शिकलेलेही उतरले; तज्ज्ञांनी दिले 'हे' मत


वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा देत वीजबिले फाडून वीजवितरण अधिकाऱ्यांच्या तोंडावर भिरकावली होती. वाढीव वीजबिलाबाबत निर्णय घ्या. अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने भूमिका जाहीर न केल्याने मनसेने राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी औरंगपुरा भागात आंदोलन केले. आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..

हेही वाचा -रेल्वे, विमान प्रवासावर लक्ष केंद्रित करताना राज्याच्या सीमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष

Last Updated : Nov 26, 2020, 2:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details