महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यानी केला दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात - औरंगाबाद दहीहंडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. निर्बंध असूनही मनसे कार्यकर्त्यानी दहीहंडी फोडत सण साजरा केला. त्याचाच प्रत्यय औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर चौकात मनसे कार्यकर्त्यानी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न
दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न

By

Published : Sep 1, 2021, 9:06 AM IST

औरंगाबाद - मनसेच्यावतीने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. यावेळी सिडको पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली.

मनसे कार्यकर्त्यानी केला दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर लावण्यात आलेल्या निर्बंधांबाबत आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. निर्बंध असूनही मनसे कार्यकर्त्यानी दहीहंडी फोडत सण साजरा केला. त्याचाच प्रत्यय औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर चौकात मनसे कार्यकर्त्यानी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी कार्यकर्त्याना घेतलं ताब्यात -

टीव्ही सेंटर चौकात मनसे कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी फोडणार असल्याच जाहीर केलं. त्यांच्या निर्णयाला हाक देत औरंगाबाद शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी टीव्ही सेंटर चौकात दहीहंडी फोडणार असल्याच जाहीर केलं. त्यानुसार पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला. सायंकाळी सहाच्या सुमारास मनसे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाठी आणि कार्यकर्ते दहीहंडी फोडण्यासाठी आले असताना पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. मनसे कार्यकर्त्यांकडे असलेले साहित्य पोलिसांनी जप्त करत कार्यकर्त्याना ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details