औरंगाबाद : केटरिंगचे पैसे मागणाऱ्या व्यावसायिकाला धमकावल्याची घटना औरंगाबाद येथे उघडकीस आली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी धमकावल्याचा (Siddhant Shirsat threat to contractor) आरोप करण्यात आला आहे. इतकच नाही तर त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या पदाचा गैरवापर करून व्यावसायिकांना धमकावणे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (MLA Sanjay Shirsat Son Threat)
MLA Son Threat : 'या' आमदारपुत्राची व्यावसायिकाला हात-पाय तोडण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल - Sanjay Shirsat
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat ) यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी व्यावसायिकाला धमकावल्याची (Siddhant Shirsat threat to contractor) आरोप करण्यात आला आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये आमदार पुत्राने हात पाय तोडण्याची धमकी (MLA Sanjay Shirsat Son Threat) दिली असल्याचा आरोप व्यावसायिकाकडून करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण : औरंगाबाद येथे केटरिंगचा व्यवसाय करणारे श्रीशरण गायकवाड यांनी केलेल्या आरोपानुसार, 2017 आली आमदार संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे जेवणाचे कंत्राट गायकवाड यांनी घेतले होते. आमदार असल्याचे सांगत जेवणावर 75 हजारांचा सूट त्यांनी करून घेतली. कार्यक्रम तर झाला मात्र पैशांसाठी गेली पाच वर्ष चकरा माराव्या लागल्या. तितकंच नाही तर पैसे देताना तेही कमी देऊन धमकावल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्या संदर्भात पैसे मागत असताना सिद्धांत शिरसाट यांनी अपशब्द वापरून धमकी दिल्याचा गायकवाड यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्या संबंधात संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील त्यांनी समाज माध्यमांना दिली आहे.
पोलिसात देणार तक्रार : आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत 40 हजार रुपये घेऊन जा असं सांगून बाहेर आल्यावर वीस हजार रुपये आपल्याला मिळाले असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. त्या संदर्भात सिद्धांत शिरसाट यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अवमानकारक वागणूक दिली. तितकेच नाही तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्याबाबत मुकुंदवाडी पोलिसात तक्रार देऊन पोलीस आयुक्तांकडे देखील त्याबाबत लिखित तक्रार नोंदवणार असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. तर याबाबत सिद्धांत शिरसाट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे नेमके शिरसाट यांचं काय स्पष्टीकरण आहे ते अद्याप समोर येऊ शकलेले नाही.