औरंगाबाद : आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत. हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबावाखाली आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. (Sanjay Shirsat criticize Sanjay Raut). संजय राऊत कधीही जुळवून घेणार नाही आणि ते शिवसेना वाढू देणार नाही, त्यांचं महत्त्व कमी होईल म्हणून ते तसं होऊ देणार नाहीत, सुषमा अंधारे यांचे काही भाषणे चर्चेला आले, मात्र आता त्यांना सुद्धा गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पक्षातील जुने नेते कुठे गेले ते काही बोलत नाहीत. जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे. (Sanjay Shirsat on Sanjay Raut).
आम्ही पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत :सध्या शिवसेना पक्षातर्फे जे काही बोलतात ते फक्त आणि फक्त संजय राऊत बोलतात. त्यांच्या वक्तव्याची दखल उद्धव ठाकरे का घेत नाहीत? का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न नेहमी पडतो. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यावेळेस पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, हे कुठेतरी संजय राऊत यांच्या दबाव खाली आहेत, असं वाटतं अशी टीका शिरसाट यांनी केली. नीलम गोरे यांना तळागाळात काम करण्याची माहिती आहे. त्यामुळे आपल्या पक्षातून जर बाहेर कोणी जात आहे तर त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात येत आहे. संजय राऊत सारखं आले, राहिले, गेले तरी काही हरकत नाही. अशा वृत्तीच्या त्या नाही. पक्ष सोडून गेलेल्यांना हीनवणे हे राऊत यांचं काम आहे. मात्र ते का गेले याबाबत नीलम ताई यांना जाण आहे. त्यामुळे त्यांचं मत उद्धव ठाकरे किती लक्षात घेतात हे पहावं लागणार आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.