औरंगाबाद - काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येत धक्कादायक वास्तव समोर आले. अंकुश म्हैसमाळे (वय 16 वर्ष) असे मृत मुलाचे नाव असून, मोबाईल न दिल्याच्या रागातून आत्येभावानेच हत्या ( Minor Boy Killed Cousin For Mobile ) केल्याचे तपासात उघड झाले आहे. हा गुन्हा आता वाळूज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
अशी आहे घटना -
अंकुशला त्याच्या आजोबांनी नवीन मोबाईल फोन विकत घेऊन दिला. तसा फोन आपल्याकडे हवा अशी इच्छा त्याचा आत्येभावाची होती. त्यात अल्पवयीन आरोपीने मयत अंकुशला 30 नोव्हेंबर रोजी राजुच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत ढोरकीन शिवारात गेला. त्याठिकाणी फोटो काढण्याचा बहाणा करत आरोपीने अंकुशला विहिरीत ढकलले, तो स्वतः सावरून वर येत असतांना त्याच्या डोक्यात दगड टाकून मोबाईल घेऊन पसार झाला. या प्रकरणाची नोंद पैठण औद्योगिक पोलिसांनी घेण्यात आली होती.