औरंगाबाद -विरोधक आपले राजकारण राजभवनातून करत आहेत. राज्य संकटात असताना शासन अस्थिर करणे दुर्दैवी आहे, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबदमध्ये केली
'विरोधकांच राजकारण राजभवनामधून, हे दुर्दैव'
राजकीय संघर्षासाठी सर्वच राजकीय पक्ष तयार असतात. मात्र, राज्य संकटात असताना शासन अस्थिर होऊ नये याची काळजी विरोधकांनी घेतली पाहिजे. कोरोना संकटात सर्वांनी सहकार्य करायला हवे मात्र, विरोधकांनी यात राजकारण आणले आहे. त्यात राजभवनाचा वापर केला जातो हे दुर्दैव आहे, अशी खंत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे झाले असते तर राज्याला आनंद झाला असता मात्र, असे झाले नाही, अशी खंत सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचे राजभवनात उठणे-बसणे वाढले आहे. त्यावरून तेथेच राजकारण होत आहे, असे दिसते. राजकीय संघर्षासाठी सर्वच राजकीय पक्ष तयार असतात. मात्र, राज्य संकटात असताना शासन अस्थिर होऊ नये याची काळजी विरोधकांनी घेतली पाहिजे. कोरोना संकटात सर्वांनी सहकार्य करायला हवे मात्र, विरोधकांनी यात राजकारण आणले आहे. त्यात राजभवनाचा वापर केला जातो हे दुर्दैव आहे, असे देसाई म्हणाले.