महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID 19 : वाहतूक बंद असल्याने औषधे शहरात येण्यास विलंब - aurngabad news

औरंगाबाद येथे भिवंडी, नागपूर, पुणे येथून औषधी पुरवली जातात. कोरोनामुळे वाहतुक सेवा बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या औषधीसाठी वाहन उपलब्ध होणे, त्या वाहनात पूर्णमाल भरणे या प्रक्रियेला उशीर होत असल्याने पुरवठा करण्यास उशीर होत आहे.

medicines-transport-late-due-to-covid-19
COVID 19 : वाहतूक बंद असल्याने औषधी शहरात येण्यास विलंब

By

Published : Apr 13, 2020, 2:41 PM IST

औरंगाबाद -कोरोनामुळे सर्वत्र वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम औषध पुरवठ्यावर होत आहे. जिल्ह्यात बाहेरून येणारी औषधे ८ दिवसांनी पोहचत असल्याची माहिती मिळाली आहे.


औरंगाबाद येथे भिवंडी, नागपूर, पुणे येथून औषधी पुरवली जातात. कोरोनामुळे वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या औषधीसाठी वाहन उपलब्ध होणे, त्या वाहनात पूर्णमाल भरणे या प्रक्रियेला उशीर होत असल्याने पुरवठा करण्यास उशीर होत आहे. मेडिकल असोसिएशनतर्फे औषधे वेळेवर मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे औषध विक्रेते निखिल मित्तल यांनी सांगितले.

COVID 19 : वाहतूक बंद असल्याने औषधी शहरात येण्यास विलंब
लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सार्वजनिक वाहतुकीसोबत माल वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे किराणा सामान वाहतुकीसोबत मोठा परिणाम झाला तो औषधी पुरवठ्यावर. पुणे, भिवंडी, नागपूर येथून औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दोन हजार औषधी दुकानांना औषधी पुरवली जातात. एरवी २ दिवसात येणारी औषधी आता ८ दिवसांनी येत आहेत. मात्र, त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ नये, यासाठी औषध विक्रेते काळजी घेत असल्याची माहिती औरंगाबादचे औषध विक्रेते निखिल मित्तल यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details