महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिल्लोड नगर परिषदेकडून उपाययोजना - Aurangabad breaking news

कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. त्या अनुषंगाने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार कोरोनाचा पुढील धोका रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली आहे.

Sillod
फवारणी

By

Published : Mar 14, 2021, 3:00 PM IST

Updated : Mar 14, 2021, 3:34 PM IST

सिल्लोड (औरंगाबाद) - कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. त्या अनुषंगाने महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार कोरोनाचा पुढील धोका रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिल्लोड नगर परिषदेकडून उपाययोजना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या सूचना व नियम लागू केले आहेत. याचे प्रत्येक नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. नाहक होणारी गर्दी टाळून नागरिकांनी हात धुणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन अब्दुल समीर यांनी केले आहे.

Last Updated : Mar 14, 2021, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details