महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जायकवाडी धरणात आढळले पती-पत्नीचे मृतदेह; आत्महत्या केल्याचा अंदाज

पैठण तालुक्यातील जायकवाडी नियंत्रण कक्षाला एक ते दीड किलोमीटर क्षेत्रांमध्ये पुरुष व महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेची माहिती जयकवाडी नियंत्रण कक्षाचे गणेश खराडकर यांना कळताच त्यांनी पैठण पोलिसांना कळविले.

पती-पत्नी मृतदेह
पती-पत्नी मृतदेह

By

Published : Dec 5, 2020, 5:24 PM IST

औरंगाबाद - पैठण येथील जायकवाडी धरण क्षेत्रात पती-पत्नीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले आहे. ही घटना 5 डिसेंबरला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीला आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या दाम्पत्यानी उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सूर्यभान दयाराम राऊत व कौशल्या राऊत असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.


पैठण तालुक्यातील जायकवाडी नियंत्रण कक्षाला एक ते दीड किलोमीटर क्षेत्रांमध्ये पुरुष व महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेची माहिती जयकवाडी नियंत्रण कक्षाचे गणेश खराडकर यांना कळताच त्यांनी पैठण पोलिसांना कळविले.

हेही वाचा-मुलाच्या विरहात पित्याने केली आत्महत्या; परभणी येथील घटना

माहिती मिळताच पैठण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत. पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पैठण येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळावर एक मोबाईल, चिठ्ठी, धरणाच्या भिंती वरील दगडाच्या पिचिंगवर चप्पल, बूट, खाद्यपदार्थ असे साहित्य सापडले आहे.

हेही वाचा-बुलडाण्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी तणावातून घेतला गळफास

मृत दाम्पत्य हे पैठण तालुक्यातील हर्षी येथील रहिवासी आहेत. ते सध्या औरंगाबादमध्ये राहत होते, अशी माहिती समोर येत आहे. दोघांनी तणावाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा पंचनामा पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम सांगडे हे करत आहेत. पोलीस तपासानंतरच दाम्पत्याचे मृत्यूचे खरे कारण कळू शकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details