महाराष्ट्र

maharashtra

Maratha Protest Effect : मराठा आंदोलनाचा परिणाम; राज्यात अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 5:53 PM IST

Maratha Protest Effect : राज्यातील काही भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे (Rumors of Maratha agitation) मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने राज्यातील काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर, बीड आणि जालना जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात सेवा बंद करण्यात आली आहे.

Maratha Protest Effect
इंटरनेट सेवा बंद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Maratha Protest Effect :राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनात इंटरनेटमुळे समाजात अफवा पसरवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुढील ४८ तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्देश गृह विभागाने जारी केला आहे. (Maratha agitation turning violent) याआधी मराठवाड्यात बीड आणि जालना जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात सेवा बंद करण्यात आली आहे. (internet service suspended) सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू असताना अनेक अफवा पसरवण्याचं काम काही ठिकाणी होत आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला.


काही भागात आंदोलनाला हिंसक वळण :मराठा आंदोलनात२५ ऑक्टोबर पासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. अन्नत्याग आंदोलन करून शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. राज्यात अनेक ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी साखळी उपोषण, धरणे अशी आंदोलनं सुरू करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी हिंसक पद्धतीची आंदोलनं करण्यात येत आहेत. 'रस्ता रोको' करताना टायर जाळण्याचे प्रकार, तर कुठे गाड्या फोडण्यात आल्या.

अफवा टाळण्यासाठी निर्णय :बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय जाळण्यात आले. अशा घटना घडत आहेत. परंतु, या घटना इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पाठवण्याचं काम केलं जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर येणाऱ्या माहिती बाबत चिंता व्यक्त करत युवक आत्महत्या करण्याचं पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शांततेच्या आंदोलनाला चुकीची दिशा मिळत असल्याने गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि अफवा टाळण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलाय. त्यात पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री या भागात पुढील ४८ तास इंटरनेट सेवा बंद असणार आहे. मात्र, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी यावर बोलण्यास टाळले असून शांतता बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.



मराठवाड्यात अनेक ठिकाणी परिणाम :राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून सर्वत्र आक्रमक आंदोलन करण्यात येत आहेत. त्यात बीड आणि जालना जिल्ह्यात हिंसक स्वरूपाची आंदोलनं अधिक असल्यानं या भागातील इंटरनेट सेवा याआधीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या ऑनलाईन पद्धतीनं येणारी माहिती काही प्रमाणात बंद झाली आहे. त्यामुळे चुकीची माहिती जाणार नाही अशी आशा सरकारच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

  1. Maratha Protest : मराठा आरक्षणाचं लोन मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत; दगाफटका होण्याची शक्यता - सुप्रिया सुळे
  2. Maratha Reservation : दबावापोटी सरकारकडून आरक्षणाच्या निर्णयास विलंब - बच्चू कडू
  3. Devendra Fadnavis: मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details