महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हर्षवर्धन जाधवांना मराठा समाजाच खुलं पत्र, वंचितसोबत जाण्याच्या वक्तव्यावर नाराजी - MLA harshwardhan jadhav

हर्षवर्धन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याची शक्यता वर्तवल्याने मराठा समाज बांधवात चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद

By

Published : May 27, 2019, 5:27 PM IST

Updated : May 27, 2019, 7:38 PM IST

औरंगाबाद - हर्षवर्धन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवल्याने मराठा समाज बांधवात चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही तर, मराठा समाजाला घेऊन वंचित आघाडीसोबत बोलणी करू असे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर मराठा समाजाने खुलं पत्र लिहून त्यांना जाब विचारला.

मराठा समाजालासोबत घेऊन जाताना आधी त्यांना विचारले का? असा प्रश्न या पत्राच्या निमित्ताने उपस्थित केला गेला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कन्नडच्या आमदारकीचा राजीनामा हर्षवर्धन जाधव यांनी दिला. इतकेच नाही तर लोकसभा निवडणूक लढवत औरंगाबादमधून हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 86 हजार मते मिळवली. लोकसभेत चांगली मते मिळाल्याने आता विधानसभेची निवडणूक लढण्याचे संकेत हर्षवर्धन जाधव यांनी दिले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही तर विधानसभा निवडणूक वंचितसोबत जाऊन लढू असे संकेत दिले. या वक्तव्यावर मराठा समाजाने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. इतकेच नाही तर एक खुलं पत्र त्यांना लिहिण्यात आले. मराठा समाजालासोबत घेऊन जाण्याची भाषा करताना मराठा समाजाला विचारले का? असा प्रश्न या पत्रातून विचारण्यात आला. त्यामुळे लोकसभेत हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी असणारा मराठा समाज विधानसभेला देखील त्यांच्या सोबत राहील का? हा प्रश्नच आहे.

Last Updated : May 27, 2019, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details