गंगापूर (औरंगाबाद) -गंगापूर तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील शिवना नदीला महापुर आला असुन शिवना काठावरील शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शिवना, नारळी, होळी, नागझरी, खाम, लेंडी नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असुन ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. शिवना नदीला आलेल्या पुराने मालुंजा पुलावरून पाणी वाहत असल्याने गंगापूर लासुर मार्ग बंद करण्यात आला होता. जोरदार झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरूप आले असुन काढणीला आलेले कापुस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
होळी नदीचा केटीवेअर फुटल्यामुळे मोठे नुकसान
तालुक्यातील माळीवाडगाव परिसरात असलेल्या होळी नदीवरील केटीवेअर फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने कापुस, मका, तंबाटे वाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहाने जमीन खरडून गेली आहे. माळीवाडगाव येथील होळी नदी काठवर असलेल्या गट क्रमांक 179, 180 मधील शेतकऱ्यांचे केटीवेअर फुटल्याने शेतात पाणी शिरल्याने जमीन खरडून गेली आहे. शेतातील पिके वाहून गेल्याने सोमनाथ वाघचौरे, साईनाथ वाकचौरे, राजू वाकचौरे, कैलास दुशिंग आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुरात अडकलेल्या १२ नागरिकांची रात्री सुटका