औरंगाबाद- मुंबई नंतर सर्वाधिक कोरोना चाचण्या औरंगाबादमधे होत आहेत. त्यासाठी घाटी रुग्णालयाचे कौतुक केले पाहिजे. कारण विक्रमी सहा हजार चाचण्या इथे करण्यात आल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. आता नागरिकांनी अधिक सतर्क राहीले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
... म्हणून औरंगाबादमध्ये रुग्ण संख्या वाढली; पालकमंत्री सुभाष देसाईंचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र दिवस असून हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्रावर वेगळे संकट आहे हे संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद विभागाची जिल्हा नियोजनाची बैठक घेतली आहे. यामध्ये वार्षिक निधीपैकी 25 टक्के निधी कोरोनासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजनाचा निधी 81 कोटी रुपये कोरोनासाठी दिला आहे. खाजगी डॉक्टरच्या नियुक्त्या निधी अभावी रखडल्या होत्या. मात्र, आता निधी उपलब्ध झाल्याने नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून आरोग्या बाबतीत काही कमी पडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र दिवस असून हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्रावर वेगळे संकट आहे हे संकट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार होईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात सोशल डिस्टन्सचे पालन करत ध्वजारोहण करण्यात आले. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. नागरिकांमुळे आतापर्यंत 90 टक्के भाग सुरक्षित आहे. तसाच असावा यासाठी पोलीस आणि प्रशासन काळजी घेत आहे. लोकांनीही अधिक काळजी घ्यावी.
औरंगाबादचा ग्रामीण भाग अजून सुरक्षित आहे ही चांगली गोष्ट आहे. शहरात 115 प्रभाग आहेत त्यापैकी 15 ते 16 भागांमध्ये धोका आहे. त्यामुळे लॉक डाऊन कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन ते तीन दिवसांनी पूर्ण बंद पाळणे अशा उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोनाला आपण हरवू शकतो असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.